सातारा जिल्ह्याला ३ मंत्रीपद मिळणार !

0

अनिल वीर  सातारा : नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला कौल मिळाला आहे. त्यामुळे वरिष्ठ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाबाबत योग्य तो निर्णय घेतलीच. मात्र,सातारा जिल्ह्यामधील महायुतीतील प्रामुख्याने,३ घटक पक्षातील ३ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होईल.अशी चर्चा सुरू झाली आहे.

           सातारा जिल्ह्यातील आ. शंभूराजे देसाई (पाटण),आ. मकरंद पाटील (महाबळेश्वर-वाई-खंडाळा) व आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा-जावली) हे दावेदार आहेत.आ.देसाई हे मुख्यमंत्री यांचे खंदे समर्थक राहिलेले आहेत.त्यामुळे त्यांना पुन्हा एखदा कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकेल.आ.पाटील यांनी अजितदादा गटात सामील झाले होते.तेव्हाच मंत्रिपदाची ऑफर दिली होती.

त्यांचे बंधू नितीन काकांना राज्यसभेवर खासदार केले असले तरी आ.पाटील यांना दिलेल्या अश्वासनामुळे गळ्यात मंत्रिपद पडू शकते. कर्तबगार व अनुभवी असणारे आ.भोसले यांनी सातारा-जावली तालुक्यात केलेल्या कामाची पोहचपावती म्हणुन देवाभाऊ मंत्रिपद देतील.२५ नोव्हेंबरला राज्यमंत्रीमंडळाचा शपथविधी कार्यक्रम होईल.असे समजत असून याबाबत जिल्ह्याचे लक्ष्य लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here