सातारा तालुकास्तरीय स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत बसाप्पाचीवाडी शाळेचे यश

0
फोटो : विजेत्या खेळाडूंसह गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ व इतर.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : अंगापूर येथे पार पडलेल्या सातारा तालुकास्तरीय स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बसाप्पाचीवाडी शाळेतील इ. ७ वीतील विद्यार्थिनी सेजल सुधीर वाघमळे हिने ३० किलो वजनगट (मुली) यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ४० किलो वजनगट (मुले): ओम विकास देशमुख, ३२ किलो वजनगट (मुले): विघ्नेश शंकर निकम व अथर्व जितेंद्र शेळके, २५ किलो वजनगट (मुले): स्वराज दत्तात्रय घाडगे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवले.

        याकामी,मार्गदर्शक शिक्षक प्रविण क्षीरसागर, मुख्याध्यापक माने, सहशिक्षिका सौ. चौगुले व ढेबे आदींनी अथक असे परिश्रम घेतले.याबद्धल गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्ताराधिकारी सौ.जयश्री गुरव, केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे आदींनी  अभिनंदन केले.

फोटो : विजेत्या खेळाडूंसह गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ व इतर.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here