सातारा/अनिल वीर : १० एप्रिलपासून ग्रामपंचायत सातारा तालुक्यातील कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले, उपाध्यक्ष भीमाशंकर कोळी, सचिव अजय वाघ,सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी गटविकासाधिकारी यांना निवेदन देवून विविध मागण्या साठी काम बंद आंदोलन जाहिर केले आहे.
“विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी एकजूट दाखविण्यासाठी सर्व कर्मचारी बंधूंनी १० तारखेपासून आपला संप सुरू होणार आहे. त्यात सर्व कर्मचारी बंधूंनी संपात पूर्ण ताकदीने उतरू या. शासनाला आपली ताकद दाखवून देऊ. कोणी कोणत्याही संघटनेत असू द्या. फक्त आणि फक्त कर्मचारी म्हणून आपल्या मागण्या मान्य करून घेवूया. संधी आलेली आहे. तरी सर्वजण एकत्र आले पाहिजे. जर आपण संघटना संघटना करीत बसलो तर आपल्याला काहीच मिळणार नाही. जरा विचार करा.नुकतेच शिक्षक, ग्रामसेवक जि.प. कर्मचारी आदींनी मागण्यासाठी सर्व संघटनानी एकत्र येवून लढा दिला होता. आपल्याला त्यांच्यासारखा पगार नाही. इतर काहीच सुविधा उपलब्ध नाहीत.आपल्याला पगारही कमी आहे. तो पण वेळेवर नाही. कामे भरपूर असतात.तेव्हा आपले पुढील दिवस चांगले घालवायचे असतील तर संधी आहे. संपात सामिल व्हा.सर्व कर्मचारी बंधूंनी गावाला सरपंच ग्रामसेवक व शासनाला आपली किंमत कळू द्या. तरी सर्व कर्मचारी बंधूंनी कामबंद आंदोलन करून आपल्या मागण्या मान्य करून घेवूया. तरी कामबंद आंदोलनात सर्वानी सहभागी व्हावे.” असे आवाहन जिल्हाध्यक्ष रमेश भोसले यांनी केले आहे.