खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील अर्बनग्राम अपार्टमेंटमध्ये जान्हवी भानुदास कोळेकर (वय २६, सध्या रा.धनगरवाडी, मूळ रा. नांदल ता. फलटण) या विवाहितेने घराच्या गॅलरीतील लोखंडी बारला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली
.
शिरवळ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, धनगरवाडी हद्दीतील या अपार्टमेंटमध्ये भानुदास कोळेकर कुटुंबीयांसमवेत राहण्याकरिता असून ते धनगरवाडी येथील व्हिलो कंपनीमध्ये सेफ्टी ऑफिसर म्हणून कामाला आहेत. शुक्रवारी (दि. १२) भानुदास कोळेकर कंपनीमध्ये कामासाठी गेल्यानंतर सायंकाळी घरी परतले असता पत्नी जान्हवी हिने घरातील गॅलरीच्या लोखंडी दरवाज्याच्या बारला ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. यावेळी भानुदास कोळेकर यांनी याबाबतची कल्पना शिरवळ पोलीस ठाण्याला दिली.