अनिल वीर सातारा : येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर राज्य संरक्षित स्मारक अद्याप उपेक्षितच आहे. बाबासाहेब यांनी लहानपणी सातारा येथे प्राथमिक शिक्षण घेत असताना आपल्या कुटूंबासमवेत येथील सि.स.नं.१ मधील ब्रिटिशकालीन बंगल्यात (आमने निवास) येथे सन १८९६ ते १९०४ या कालावधीत वास्तव्य केल्याने या इमारतीस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.संपूर्ण आंबेडकरी अनुयायी यांच्यावतीने अनेक वर्षे सतत या इमारतीचे स्मारकात रूपांतर व्हावे. अशी आग्रही मागणी होत आहे.त्याच अनुषंगाने आंदोलन करून हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता.तरीही अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही.त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्यामध्ये असंतोष असल्याचे मत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने २००४ रोजी जनभावना लक्षात घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून हा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. सर्व कागदपत्रे पुरावे सादर करून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य व पुरातन वास्तू संगृाहलय येथे सादर करण्यात आला.या विभागाने २००७ रोजी सर्व कागदपत्रांची शहानिशा करून सदर इमारतीचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्य संरक्षित स्मारक जाहीर केले होते.
त्या बाबतचा पाठपुरावा केल्यानंतर या इमारतीच्या जागेच्या संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया २०१४ म्हणजे जवळ जवळ १० वर्षांच्या संघर्षानंतर पूर्ण होऊन त्यासाठी लागणारा निधीही शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला होता. परंतु कार्यवाही पूर्ण होवू शकली नाही.भूसंपादनाची कारवाई पूर्ण करत असताना माणुसकीच्या तत्वावर सदरच्या तत्कालिन जिल्हाधिकारी यांना लेखी विनंती अर्जाद्वारे ८ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हा सम्बधितांनी प्रलंबित असलेला प्रश्न निकालात काढुन न्याय द्यावा.अशी मागणी होत आहे.