सातारा : खिरिया बाग शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्याकरिता नागरिक, सामाजिक,सांस्कृतिक आदी संघटना आणि सर्वपक्षीय राजकीय संघटना यांची संयुक्त जन मिटिंगचे नियोजन रविवार दि.८ रोजी येथील शहर काँग्रेस कमिटी कार्यालय, गुलबहार हॉटेल समोर सकाळ कार्यालय शेजारी पोवई नाका,सातारा येथे सकाळी ११।। वा. करण्यात आले आहे.
आयोजक म्हणून भगवान अवघडे,प्रकाश खटावकर, माणिक आढाव,अनिल वीर आदींनी राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन व संविधान लोकजागर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी मंदूरी आझमगढ येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन गेली ८३ दिवस सुरू आहे. त्यांनी २००३मध्ये विमानतळासाठी १०४ एकर जमीन आधीच दिली आहे.आता ते मंदूरी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आणखी ६७० एकर जागा देण्यास तयार नाहीत. प्रशासनाकडून सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. भूसंपादनामुळे सुमारे २५ हजार लोक बाधित होणार आहेत. विमानतळाची खरोखर गरज नाही.हे आंदोलन स्थानिक समस्या नसून खासगीकरणाच्या धोरणाचा राष्ट्रीय मुद्दा आहे. जो सर्वसामान्यांच्या डोक्यावर घिरट्या घालत आहे. हे आपल्या सार्वभौमत्वाला धोका आहे.तेव्हा आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्यानी वेळेवर उपस्थित रहावे. असे आवाहन भगवान अवघडे यांनी केले आहे.