अनिल वीर सातारा : महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे. यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावा. या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार दि.२ रोजी एकदिवसीय आंदोलन भन्ते दिंपकर (थेरो) यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत करण्यात आले आहे.
सकाळी १० वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.तद्नंतर शांततेच्या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रस्थान होणार असून आंदोलन हे दिवसभर राहणार आहे. सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केल्यानंतर डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप होईल.तेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे आजी-माजी श्रामणेर,पदाधिकारी,बौद्धाचार्य,उपासिका व उपासक यांनी वेळेवर उपस्थीत रहावे. असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
बुद्धगया येथे आंदोलन करणाऱ्या भिक्खुसंघाना उत्तरोत्तर जगभरातून वाढत पाठींबा मिळत आहे.