सातारा : येथील भिमाई भुमीत धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे Dhamma Chakra Promotion Day प्रथमच गझल भिमगीतांचा कार्यक्रम गझलकार अशोकराव गायकवाड (पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यांना भिम शाहीर किरण जगताप, बंधुत्व आदर्श गायिका कल्पना कांबळे आदींनी साथ दिली. प्रथमतः भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गझलकार अशोकराव गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले. आयोजन विविध कार्यक्रमाने मोठ्या दिमाखात प्रारंभ करण्यात आला आहे.
प्रथमच गझल भिमगीतांचा कार्यक्रम गझलकार अशोकराव गायकवाड (पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्यांना भिम शाहीर किरण जगताप, बंधुत्व आदर्श गायिका कल्पना कांबळे आदींनी साथ दिली. प्रथमतः भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गझलकार अशोकराव गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार आर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शंकर गंगावणे यांनी उपस्थीतांना पेढे वाटप करून आनंद द्विगुणित केला.यावेळी सामुहीक धम्म वंदना व सुत्त पठण आदी विधी घेण्यात आले.यावेळी संयुक्त जयंती समारोह समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,बी.एल. माने,वसंत गंगावणे,ऍड.विलास वहागावकर,ऍड.हौसेराव धुमाळ, चंद्रकांत मस्के,गौरव भंडारे, संदिप कांबळे,बाळकृष्ण देसाई, अमोल माणिक आढाव, मारुती भोसले, अशोक भोसले, सुनील त्रिम्बके, अरुण जावळे, पी.डी. साबळे, यशपाल बनसोडे, बळीराम जाधव,आदिनाथ बिराजे,हरिदास जाधव, बाळासाहेब सावन्त,नारायण जावलीकर, मच्छिन्द्र जाधव, किशोर धरपडे, अनिल वीर आदी विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते, उपासक – उपासिका यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरातील सांस्कृतीक सभामंडपाच्या प्रांगणात जल्लोष केला.शेवटी समितीच्यावतीने चहा-पान देऊन सांगता केली.