सातारा येथे प्रजासत्ताक दिनापासून  संविधानबाबत सप्ताहभर कार्यक्रम

0

सातारा : संविधान लोकजागर परिषद,राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन व तत्सम संघटनांच्यावतीने प्रजासत्ताक दिनी संविधानबाबतच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहभर विविध उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.

              अध्यक्ष भगवान अवघडे यांच्या अध्यखातेखाली नुकतीच सहविचार सभा संपन्न झाली. त्यामध्ये वरील विषयावर निर्णय घेण्यात आला.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते व मुक्तीवादी संघटनेचे अध्यक्ष जयंत उथळे,म.अंनिसचे प्रशांत पोतदार,प्रकाश खटावकर, प्रा.दत्ताजी जाधव,शाहिर प्रकाश फरांदे,गणेश देशमुख,ऍड.दयानंद माने,अशोक बनसोडे,माणिक आढाव,महेंद्र तथा दिलीप भोसले,संजय नितनवरे, बाळासाहेब शिरसाट, परवेज सय्यद,ऍड.हौसेराव धुमाळ, अनिल वीर,युवराज साबळे, विजय पवार आदी संविधानप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

          लोकशाही आणि संविधान कसे पायदळी तुडविण्याचे काम राज्यकर्तेच कसे करत आहेत ? यावर चर्चाविनिमय करण्यात आला. ज्यांना देश सांभाळायचा आहे. तेच देश विघातक विधाने करत आहेत. हे स्पष्ट करण्यात आले. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनातन हिंदू धर्माचा विजय असो. अशी घोषणा देणे तर देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी न्यायपालिकेवर आक्षेप घेऊन संसदेने केलेल्या कायद्याची चिकित्सा न्यायपालिका करू शकत नाही. असे सांगणे म्हणजे त्यामुळे संसद श्रेष्ठ का न्यायपालिका श्रेष्ठ ? असा वाद निर्माण करण्यात आला आहे.अशी वक्तव्य केल्यामुळे जनता गोंधळात पडली आहे. शिवाय,संविधानाच्या अनुच्छेद १३ वर प्रश्नचिन्ह उभे राहून घटना दुय्यम दर्शवली जात आहे. अशा कितीतरी घटना व प्रसंग दैनंदिन घडतच आहेत. याचा पाठच जयंत उथळे व इतरांनी उदाहरणांसह कथन केला.असे असले तरी भारतीय नागरिकांनी संविधान समजून घेऊन लोकांची सुरक्षितता संविधानाने कशी केली आहे ?  हे सांगण्यासाठी गोल बागेसमोर मंडप टाकून संविधान आधारित पोस्टरचे प्रदर्शन प्रजासत्ताक दिनी अर्थात, दि.२६ जानेवारीला करण्यात येणार आहे. तसेच इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो…. हे पथनाट्य व संविधान फिल्म शो सदरच्या दिवशीच सादर करण्यात येणार आहे. दि.२६ जानेवारी ते दि.१फेब्रुवारी अखेर संविधान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.आयोजित केलेले उपक्रम महाविद्यालये व प्रमुख ठिकाणी प्रदर्शीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी टीम तयार करण्यात आलेल्या आहेत.तेव्हा त्यांनी आपापली जबाबदारी वेळेवर पार पाडावी.असेही सर्वानुमते ठरविण्यात आले.पोस्टर्स प्रदर्शन उद्घाटन प्रकासत्ताकदिनी सकाळी ११ वा.होणार असून रात्रौ संविधान चित्रपट फेस्टिवल दाखविण्यात येणार आहे. संविधान सप्ताह काळात ठिकठिकाणी पथनाट्य सादर केली जाणार आहेत. शिवाय, महाविद्यालयातही पोस्टर प्रदर्शन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here