सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
धम्ममय वातावरणात सातारा शहरातील विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक सभा मंडपात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धम्मबांधव समतावादी विचारधारेच्या संघटना,संस्था, मंडळे, पक्ष, समता सैनीक दल आदी तत्सम संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते. प्रारंभी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.माणिक आढाव, दिलोप फणसे,अनिल वीर, शामराव बनसोडे आदी समितीच्या पदाधिकारी यांनी स्वागत केले.केंद्रीय शिक्षक भागवत भोसले व जिल्हा कोषाध्यक्ष विद्याधर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. धम्म ध्वजारोहन, धम्म वंदना व सुत्तपठण आदी सर्व विधीचे कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेच्या अधिपत्याखाली संपन्न झाले.तथागतांच्या प्रतीमेची भव्य रथातून मिरवणूक शहरातून काढण्यात आली.यावेळी शिबिरातील प्रशिलक्षणार्थीं चिवर मध्ये असल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या होत्या. फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.शिस्तबद्ध अशी मिरवणूक संपन्न झाली. भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादान केले.धम्म देसना संपन्न झाली.यावेळी श्रामनेर संघाची उपस्थिती होती. खिरदानाच्या कार्यक्रमाने सांगता झाली.