सातारा येथे रविवारी शिक्षकांचे चर्चासत्र,सत्कार व पुरस्कर वितरण 

0

सातारा/अनिल वीर : जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने येथील राष्ट्रभाषा भवनात रविवार दि.२८ रोजी सकाळी ९.३० ते १.३० या वेळेत इ.९वी -१०वी च्या हिंदी शिक्षकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून तद्नंतर सत्कार व पुरस्कार वितरण आयोजीत करण्यात आलेले आहेत.

               सदरच्या चर्चासत्रामध्ये माध्यमिक शालांत परीक्षेच्या २०२४ च्या हिंदी कृतीपत्रिका व नमुना उत्तरपत्रिकेच्या अनुषंगाने राहिलेल्या उणिवांच्या संदर्भात चर्चा करून दर्जेदार कृतीपुस्तिकेसंबंधी मार्गदर्शन करपाण्यात येणार आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार २०२४ च्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये द्वितीय भाषा हिंदी विषयाबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देवून हिंदी विषयावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शासनाकडे दाद मागण्यासंबंधीही निर्णय घेणेत येणार आहे.अंतिम सत्रात विद्यार्थी-शिक्षक व विद्यालयाशी संबंधीत पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आलेला आहे.

         

सत्कार व पुरस्कार वितरण माजी प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन  विभागीय वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे उपस्थीत राहणार आहेत.यावेळी शारीरिक शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष रघुनाथ जाधव व महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे सचिव रामानंद पुजारी उपस्थित राहणार आहेत.मान्यवरांच्या हस्ते  सत्कार होणार आहेत.यामध्ये उपक्रमशील शिक्षक, पतसंस्था सेवाकाल प्राप्त सदस्य, राष्ट्रभाषा प्रचार प्रसार स्कुल, महामंडळ हिंदी परीक्षा, माध्यमिक-उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, छात्रवृत्ती परीक्षा इ. ५वी,८ वी आदी,गुणवंत पाल्याशी संबंधितांना सुमारे १७५ पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.तेव्हा चर्चासत्र व पुरस्कार वितरण कार्यक्रमास शिक्षक व अध्ययनार्थी यांनी वेळेत उपस्थित रहाण्याचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर व मंडळाचे अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here