सातारा/अनिल वीर : दि बुध्दिस्ट सोसायटी आँफ इडिंया (भारतीय बोध्द महासभा),सातारा जिल्हा अंतर्गत सातारा तालुका यांच्यावतीने येथील डॉ.आंबेडकर सांस्कृतिक भवन मिलिंद सोसायटी येथे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
जिल्हा संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष,केंद्रीय शिक्षक ,समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफीसर व बंधुत्व समता सैनिक दूत पुरस्कार विजेते पिराजी सातपुते यांनी प्रशिक्षण सैनिकांना प्रांगणात दिले.पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष सुदाम ढापरे यांच्यासह पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तानाजी बनसोडे (संस्कार उपाध्यक्ष), आबासाहेब व्यवहारे (कार्यालयीन सचिव), भागवत भोसले (संस्कार उपाध्यक्ष),दिलीप फणसे (संरक्षण सचिव),अशोक भालेराव (संस्कार सचिव), विद्याधर गायकवाड (कोषाध्यक्ष) या जिल्हा पदाधिकारी यांच्यासह तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने, विजयानंद कांबळे (सचिव), नंदकुमार काळे (पर्यटन उपाध्यक्ष), मनोज वाघमारे (संरक्षण सचिव), विकास तोडकर (संस्कार उपाध्यक्ष) आदी तालुका पदाधिकारी उपस्थित होते. ॲड. विजयानंद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.मनोज वाघमारे यांनी आभार मानले.सदरच्या प्रशिक्षणास संदीप जाधव,कुमार सुर्वे,यशवंत भाले,किशोर गायकवाड,विकास काळे, द्राक्षाबाई खंडकर,शोभा भंडारे, कल्पनाताई कांबळे,नलिनी कांबळे,शरद पोळ,मनीषा पोळ, पूजा पोळ,समाधान कांबळे, ज्योती सावंत,सुवर्णा क्षीरसागर, श्रीकांत गायकवाड, राणी कांबळे, विजय परिहार, कुसुम सोनावणे आदी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.