अनिल वीर सातारा : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द बोलुन समस्त बहुजनांची मन दुखवण्याचे काम सिने अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी केलेले आहे.तेव्हा मनुवादी राहुल सोलापूरकर याचे टाळके वठणीवर आणण्यासाठी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि. १० रोजी सकाळी ११ वाजता टाळके फोड आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगचे तालुकाध्यक्ष व त्यांची कार्यकारणी,शहराध्यक्ष व त्यांची कार्यकारणी,पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच बहुजनवादी, पुरोगामी विचार संघटनेचे नेते व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन महासचिव गणेश भिसे व शरद गाडे यांनी केले आहे.