सातारा विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

0

सातारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने २६२- सातारा विधानसभा मतदार संघामधील आदर्श आचारसंहिता अंमलबजाणीसाठी निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती  प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे. २६२ सातारा विधानसभा मतदार संघ एकूण मतदार – ३४१४०८ मतदार आहेत. यामध्ये पुरुष-१७०८५१, स्त्री- १७०५२०, इतर-३७ मतदार आहेत.

मतदान केंद्र सुसूत्रीकरण- नवीन मतदान केंद्र -२०, ग्रामीण १४, शहरी -६ मर्ज मतदान केंद्र – १४, शहरी- १४ ठिकाण बदल मतदान केंद्र -१५, ग्रामीण ७, शहरी- ९ एकूण केंद्र- ४६४, ग्रामीण – ३१६, शहरी-१४८,  मतदान केंद्र ठिकाण – एकूण ठिकाण – ३४२, शहरी -६५, ग्रामीण-२७७. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नोडल अधिकारी -३१, भरारी पथक – १४, स्थायी निगरानी पथके- १३,  व्हिडिओ सर्विलेंस पथक-८,  व्हिडिओ पाहणी पथक-१, स्ट्रॉग रूम ठिकाण -डीएमओ गोडाऊन एमआयडीसी सातारा, मतमोजणी ठिकाण – डीएमओ गोडाऊन एमआयडीसी सातारा. पोलिस बंदोबस्त -४६४ मतदान केंद्रावर करण्यात आला आहे. वेबकास्टींग 232 केंद्रावर करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here