सातारा : येथील परिसरात अंनिसचे विजय पवार यांनी लिहिलेल्या,”परळीच्या पाऊलखुणा” या पुस्तकांची भेट ठिकठिकाणी देण्यात आली.
दौलतनगरमध्ये महादेव मंदिरात बहुसंख्य रसिक श्रोते यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. राजेंद्र घाडगे यांनी सुमधूर अशी तीन गाणी गायली.विजय पवार यांनी दिवाळी पहाट ही कविता सादर केली.याशिवाय,त्यांनी लिहिलेल्या, “परळीच्या पाऊलखुणा” या पुस्तकांची दिवाळी भेट सर्वांना दिली. आराधना ग्रुपच्या सर्व गायकांनी छान गाणी सादर केली. शिवशक्ती सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.अंनिसचे प्रकाश खटावकर यांच्या उपस्थिती बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना पुस्तक भेट देऊन चर्चा-विनिमय करण्यात आला.