मराठी राज्याची राजधानी असणारा सातारा, अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. यामध्ये सामाजिक राजकीय घटनांचा समावेश आहे. राजकीय पटलावर साताऱ्याला विशेष महत्त्व आहे. ब्रिटिश कालखंडामध्ये मुंबई प्रांताचे पहिले पंतप्रधान सर धनजीशाह बोमणजी कुपर यांचे निवासस्थान आणि व्यावसायिक मुख्यालय साताऱ्यातच आहे .पहिल्या प्रांतीय विधानसभेला ते निवडून आले होते. एक एप्रिल 1937 ते 19 जुलै 1937 या अल्प कालावधीसाठी ते मुंबई प्रांताचे पंतप्रधान होते.
स्वातंत्र्योत्तर कालावधीत 1956 साली राज्य पुनर्वसन कायदा लागू झाल्यानंतर मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे झाले. तो सन्मानही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मिळाला ते एक नोव्हेंबर 1956 ते 30 एप्रिल 1960 या कालावधीमध्ये मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. या कालावधीत मुंबई विधानसभेच्या दोन निवडणुका झाल्या होत्या. जवळपास साडेतीन वर्ष ते मुख्यमंत्री होते. मुंबई राज्याचे विभाजन झाल्यानंतर एक मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. यावेळीही महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदी स्व. यशवंतराव चव्हाण यांची निवड झाली. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर जवळपास अडीच वर्षाहून अधिक कालावधीसाठी स्व.यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते.
सातारा जिल्ह्याचे रहिवासी असणारे बाबासाहेब भोसले यांची 21 जानेवारी 1982 रोजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. ते सातारा जिल्ह्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले.
2 फेब्रुवारी 1983 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. जवळपास दीड वर्षाहून अधिक कालावधीसाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर तब्बल जवळपास 24 वर्षानंतर सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळाले. तिसरे मुख्यमंत्री होण्याचा सन्मान पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाला. 11 नोव्हेंबर 2010 ते 28 सप्टेंबर 2014 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. जवळपास चार वर्षासाठी मुख्यमंत्रीपद भूषविले. सातारा जिल्ह्याचे मूळचे रहिवासी असणारे एकनाथ शिंदे हे 30 जून 2022 ते पाच डिसेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. सातारा जिल्ह्याचे चौथे मुख्यमंत्री ठरले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. आणि त्यांच्या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्यातील पाच आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा जिल्ह्याचे पहिले उपमुख्यमंत्री होण्याचा सन्मान त्यांना मिळाला आहे. आणि नगर विकास आणि गृहनिर्माण संस्था खात्याचे ते राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येणारे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री झाले आहेत.
सलग चार वेळा निवडून येणारे माणचे आमदार जयकुमार गोरे यांची ग्रामविकास पंचायत राज महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली. त्याचप्रमाणे पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांची पर्यटन, खाण, व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय या विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे वाईचे आमदार मकरंद जाधव (पाटील) यांची मदत व पुनर्वसन विभागाच्या महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात चार नव्हे तर पाच कॅबिनेट मंत्री आहेत.
लेखन आणि संकलन
(पत्रकार) उमेश लांडगे…सातारा.