सातारा : यवतेश्वर घाटापासून काही अंतरावर होंडा सिटी आणि क्रेटा कारचा समोरासमोर झालेल्या धडकेत चारजण जखमी झालेत तर एक युवती या अपघातात मृत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.गायत्री समीर आहेरराव असं मृत युवतीचं नाव आहे.