साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेतील भंगार चोरीबाबत दोन आमदार एकत्र

0

 सातारा दि :(अजित जगताप) सातारा जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी सर्वप्रथम सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे व लोकप्रतिनिधी यांनी अनेकदा आंदोलन केले होते. त्याला यश मिळून सातारा वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. परंतु, त्या जागेतील लाखो रुपयांचे लोखंडी साहित्य व भंगार याची परस्पर विक्री होत असल्याने त्या विरोधात आता राष्ट्रवादी व आमदार शिंदे गटाचे आमदार दोघे एकत्र आल्याने दोषी अधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झालेला आहे.

                         याबाबत माहिती अशी की, सातारा- कोरेगाव रस्त्यावरील कृष्णा नगर या ठिकाणी पाटबंधारे विभाग तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुमारे दीडशे एकर जागा आहे. त्यापैकी वैद्यकीय महाविद्यालयाला असणारी जागा स्थलांतरित करण्यात आली आहे. या जागेवर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या इमारती असून त्यामध्ये निवासी तसेच कार्यालय इमारती आहेत. गेल्या दोन वर्षापासून या इमारती पाडण्याचे काम सुरू असून लाखो रुपयांचे लोखंडी साहित्य व भंगार तसेच खिडक्या दरवाजा असा अंदाजे पंधरा ते वीस कोटीचा अंदाजे  मुद्देमाल सापडला आहे. परंतु त्याचा कोणताही हिशोब न ठेवता काही अधिकाऱ्यांनीच ‘चोरावर मोर’ होण्याचा प्रकार केला आहे. या विरोधात राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोरच उपोषण सुरू केले. सदरच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व माजी मंत्री शशिकांत शिंदे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार महेश शिंदे यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर  कारवाई करावी. अशी मागणी होऊ लागल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाला आहे.                            सदर प्रकरण फार गंभीर असून  यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आंदोलकांनी केला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळ महामंडळाचे भंगार चोरी अनेकदा ज्वलंत प्रश्न असून चोरटे मालामाल शासकीय प्रामाणिक अधिकारी बेहाल असे त्याचे वर्णन होत आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मंत्री यांच्या नजरेतून ही बाब सुटली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आ महेश शिंदे, राष्ट्रवादीचे विधानपरिषद आ शशिकांत शिंदे अशी तीन शिंदेंनी या भंगार वाल्याचा बंदोबस्त करावा यासाठी आंदोलन होत असून राजकीय विरोधक सुध्दा एकत्र आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.आंदोलनाची धार बोथट करण्यासाठी ही खेळी करण्यात आली का?याबाबत ही उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here