सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अशोक विजयादशमीनिमित्त धम्मचक्रप्रवर्तन दिन विविध संघटनाच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,कार्याध्यक्ष अनिल वीर,कोषाध्यक्ष ऍड. हौसेराव धुमाळ व पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भारतीय बौद्ध महासभेतर्फे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव व तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे तर त्रिरत्न महासंघातर्फे धम्मचारी संघादित्य तसेच इतर तत्सम संघटना,शासकीय, निमशासकीयव राजकीय पक्षानेही दिवसभरात भेट पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस दिलीप फणसे,नंदकुमार काळे,आबासाहेब दणाने,विकास तोडकर, मनोज वाघमारे,सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे,अंकुश धाइंजे व समितीच्या पदाधिकारी यांनी स्वागत केले. केंद्रीय शिक्षक भागवत भोसले यांनी सूत्रसंचालन केले.समता सैनिक दलाने मानवंदना दिली. शुभेच्छापर मनोगत मान्यवरांनी व्यक्त केली.त्यामध्ये भन्ते दिंपकर (थेरो) व विविध संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश होता.तदनंतर धम्मरथ – मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला.यामध्ये भिक्कु संघातील श्रामणेर व प्रशिक्षणार्थी उपासक-उपासिका तसेच आंबेडकवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. संपूर्ण शहरांतून शिस्तीने व जयघोषाने छ. शिवराय पुतळ्याजवळ मिरवणूक विसावली.तेव्हाही पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विधीचाही समारोप झाल्यानंतर धम्मरथ मिलिंद हौऊसिंग सोसायटीतील सांस्कृतिक भवनमध्ये शेवट करण्यात आला.
सदरच्या कार्यक्रमास समितीचे उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर,पी.डी. साबळे, अशोक भोसले, सुखदेव घोडके,शाहिर श्रीरंग रणदिवे, युवा शाहिर सत्यवान गायकवाड, प्रसाद गायकवाड,सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे सचिव बी.एल. माने,अंकुश धाइंजे, विश्वास सावंत,बौद्धाचार्य अजित कांबळे,वसंत गंगावणे,विश्वास सावंत, किरण कांबळे, गौरव भंडारे,शोभा भंडारे,कल्पना कांबळे, दादासाहेब केंगार, जिल्हा वंचितचे उपाध्यक्ष संदीप कांबळे,धडचिरे,समता सैनिक दलातील असंख्य कार्यकर्ते आदी विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी भिम बुद्ध गीतांचा जलसा शाहिर व त्यांच्या सहकारी वर्गाने सुरू केलेला रात्री उशिरापर्यंत चालला होता.