सातारा : जगभरात शांतीचा संदेश देणाऱ्या येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणजे ख्रिसमस. हा जन्मदिवस आज शहरात जल्लोषी वातावरणात साजरा केला. शहरातील पोवई नाका, सदरबझार व इतर परिसरातील चर्चमध्ये प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते.’मेरी ख्रिसमस’ म्हणत ख्रिश्चन बांधव एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत होते.
शहरात येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला. त्यासाठी बाजारपेठेतील ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, होली रिट, प्रभू येशू व मेरी यांच्या मूर्ती, चांदणी, खेळणी यांच्या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या होत्या. आज दिवसभर मिठाई वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देत होते, तसेच शहरातील चर्चही विद्युतरोषणाईने उजळून निघाले होते. सातारा शहरातील वेगवेगळ्या चर्चमध्ये सामुहिक प्रार्थना व प्रबोधन सत्रांचे आयोजन करण्यात आले.