साताऱ्यात बुद्ध जयंती विविध कार्यक्रमाने साजरी ! 

0

सातारा : भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जयंती सातारा शहरात मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी मिलिंद कॉलनीच्या सांस्कृतिक सभागृहात सध्या शिबीर चालु आहे.ते सर्व शिबिरार्थी उपस्थित होते.यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी, मान्यवर,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.प्रथमतः पुतळ्यास पुष्पहार भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने,ट्रस्टीचे अरुण पोळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर आदींनी अर्पण करून अभिवादन करण्यात आले.संपूर्ण सूत्रसंचालन महासभेचे तालुका सचिव ऍड.विजयानंद कांबळे व केंद्रीय शिक्षक भागवत भोसले यांनी केले.समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. संपूर्ण विधी पार पडल्यानंतर मनोगत व्यक्त करण्यात आले.तद्नंतर रथातून महापुरुषांच्या प्रातिमांची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली.दरम्यान,जयंती समितीच्यावतीने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शिवाय,थंडगार पाण्याच्या बाटल्यांचेही वाटपही करण्यात आले.सदरच्या कार्यक्रमास भिमाई स्मारक समितीचे सचिव वामन गंगावणे,राष्ट्रोत्सव समितीचे उपसध्यक्ष ऍड.विलास वहागावकर,ऍड.कुमार गायकवाड, घोडके,पी.डी. साबळे,डॉ.आदिनाथ माळगे, सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे, सचिव बी.एल.माने,संबोधी प्रतिष्ठानचे विश्वस्त यशपाल बनसोडे,माजी गट शिक्षणाधिकारी डी. एस.भोसले, मारुती भोसले, चंद्रकांत मस्के,मधुसूदन काळे, एन.डी. कांबळे, जीवन मोहिते व त्यांचे सर्व कुटुंबीय व खंडाईत आप्पा यांचे सर्व कुटुंबीय,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, सरचिटणीस दिलीप भोसले,कल्पना कांबळे, प्रा.रमेश मस्के,सतीश गाडे, शिवनाथ जावळे,समता सैनिक दल, उपासक-उपासिका, समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here