साताऱ्यात मतांचा टक्का वाढला..

0

सातारा : जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीने ६४.३३ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान कोरेगाव मतदारसंघात ६९.६१ टक्के झाले असून, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण आणि पाटणमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे.
त्यामुळे हा वाढलेला मतांचा टक्का कोणाच्या बाजूने कौल देणार याची उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, भोसे (ता. कोरेगाव) येथील मतदान केंद्रावर दोन गटांत वादावादीचा प्रकार झाला. उर्वरित ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत झाली. सकाळी दहानंतर मतदान प्रक्रियेला गती आली. ग्रामीण भागात नागरिकांच्या रांगा दिसून येत होत्या. सायंकाळी पाचपर्यंत ६४.३३ टक्के मतदान झाले होते. शेवटच्या एक तासात चुरशीच्या लढती होत असलेल्या सर्वच मतदारसंघांत मतदानासाठी केंद्रावर रांगा पाहायला मिळत होत्या.

सातारा-जावळी : भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या मताधिक्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ

कोरेगाव : वाढलेला मतांचा टक्का शशिकांत शिंदे, महेश शिंदेंपैकी कोणाच्या पथ्यावर?

वाई : आमदार मकरंद पाटलांसाठी ऊस उत्पादकांची भूमिका निर्णायक ठरणार

कऱ्हाड उत्तर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बाळासाहेब पाटलांच्या पराभवासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न

कऱ्हाड दक्षिण : काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण व भाजपचे अतुल भोसले यांच्यांतील लढतीत वाढलेली मते कोणाला मिळणार?

पाटण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हर्षद कदम, शंभूराज देसाईंची किती मते खाणार यावर विजयाची गणिते अवलंबून

माण : भाजपचे आमदार जयकुमार गोरेंविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकजुटीमुळे चुरस वाढली

फलटण : आमदार दीपक चव्हाणांसाठी रामराजेंची प्रतिष्ठा पणाला 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here