संघर्ष दरबार,संवाद व पुरस्कार वितरण
अनिल वीर सातारा : पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे क्रांतिसूर्य म.जोतिबा फुले व प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त सोहळा मंगळवार दि.१ एप्रिलपासून सुरू होत आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांनी दिली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि.१ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. येथील हॉटेल ओम एक्झिक्युटिव्ह मल्टिपर्पज हॉलमध्ये,संघर्ष दरबार,संवाद व पुरस्कार वितरण होणार आहे. प्रमुख उपस्थितांमध्ये पालकमंत्री ना.शंभूराजे देसाई, लघुद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे,पीआरपी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी व बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांचा समावेश आहे.अध्यक्षस्थान पीआरपीचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे भूषवणार आहेत.
यावेळी प्रा.केशव पवार,डॉ. विलास जोंधळे व डॉ.संपत कांबळे मार्गदर्शन करणार आहेत.पुरस्कार मूर्ती किरण माने,आनंद गंगावणे,मंगल रोकडे, मिलिंद कांबळे, शाहिर रणदिवे,सुनंदा मोरे,अशोकराव पाटील,अरुण जावळे,वसंतराव ओव्हाळ,राजरत्न कांबळे,दशरथ कांबळे,सुरेखा पवार-गडकरी, किरण जगताप,अमोल बनसोडे व संजय नितनवरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे.याशिवाय, सत्कारमूर्ती प्रांजल सूर्यकांत कांबळे,भाग्यश्री नामदेव जाधव, प्रज्ञा गणेश खरात, निकिता रामचंद्र जाधव, नूरजहाँ नेबिलाल यलगार,सूरज प्रभाकर साळुंखे, हर्षल संजय जाधव, हृषीकेश शामराव जाधव,सागर दिलीप कांबळे व ओंकार बाळू नरळे यांचाही गौरव होणार आहे.याकामी,जिल्हा पदाधिकारी अथक असे परिश्रम घेत आहेत.