साताऱ्यासह पुणे व ठिकठिकाणी लोकशाहीसाठी उपोषण संपन्न !

0

निवडणुकीत सत्तेचा व पैशाचा गैरवापर : पवार

अनिल वीर सातारा : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सत्तेचा व पैशाचा गैरवापर केला असल्याचे विचार शरद पवार यांनी डॉ.बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनास भेट दिली तेव्हा बोलत होते. लढेंगे जितेंगे ! लढे हैं ! जीते है ! असा नारा देत राष्ट्रीय एकात्मिक समितीतर्फे डॉ.बाबा आढाव यांनी पुण्यात उपोषण सुरू केले आहे.त्यास सातारा व राज्यात ठिकठिकाणी पाठींबा देऊन लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तीन दिवशीय आंदोलन संपन्न झाले.

               येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सुरू असलेल्या उपोषपणाच्या अंतिम दिवशी आंदोलन कर्त्यांनी ठरविले की,”आता थांबायचे नाही.भाजपेत्तर राजकीय, सामाजिक व विविध संघटनांना सोबत घेऊन विविध पातळीवर आंदोलन करून सत्ताधारी यांना सलो की पळो करून सोडून न्याय मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.”

     

यावेळी सौ.रजनीताई दीपक पवार,ऍड.वर्षाताई देशपांडे, कॉ.मनोज चाकनकर,हाजी एम ए मुल्ला, डॉ.भास्करराव कदम, जाफरखान ग.मुल्ला,चंद्रकांत खंडाईत,सादिक अली अमीर बागवान,वामन गंगावणे,वैभव गवळी,दिलीप सावंत, जयंत उथळे,विजय मांडके, नाझीर इनामदार,हेमा सोनी,दयानंद बनसोडे,अनिल वीर, सादिक अली अमीर बागवान, संजीव बोंडे,मोहम्मद अली आभूभाई मुल्ला,अनिल मोहिते,समता प्रामाणिक, ऍड.शैला दत्तात्रय जाधव,अजित गाढवे, मिलिंद पवार, ऍड.विलास वहागावकर, सौ. कल्पना मोहिते, महेंद्र साठे, डॉ.भास्करराव कदम, मच्छिन्द्र जाधव,प्रा.मृणालिनी आहेर, किरण सगळे,निलेश गायकवाड आदी असंख्य विविध क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.गेल्या ३ दिवसात अनेकांनी भेटी देऊन जाहीर पाठींबा दिला होता.

             ७५ वर्षांपूर्वी भारताच्या संविधानाचा पहिला मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीला सादर करण्यात आला. भारतीय राज्यघटना भारतीय नागरिकांनी बस्वतः प्रत अर्पण केली. आणि या राज्यघटनेचे माध्यमातून सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार,अभिव्यक्ती विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्य दर्जाची व संधीची समानता, राष्ट्राच्या एकात्मतेचे आश्वासन देणारी बंधुता अशा मूल्यांनी युक्त भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आम्ही घडवू. असा संकल्प पूर्वक निर्धार भारतीय नागरिकांनी केला आहे.

भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत देश घडवण्याची जबाबदारी केवळ राज्यसंस्थेवर टाकलेली नाही. तर ती भारतीय नागरिकांवरही आहे. मागील दीर्घ काळापासून घटनेतील मूल्य आणि लोकशाही गणराज्य पद्धतशीरपणे नेस्तनाबूत करायचं काम राज्यसंस्थेकडून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तर त्याचा कळस गाठला गेला. निवडणुकीच्या ऐन तोंडावर पैसे वितरित करण्याची सरकारी योजना जाहीर करणे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे. मतदान सुरू होण्याआधी आणि असताना कोट्यवधी रुपये मध्यस्थ व मतदार यांना वाटले गेले. निवडणूक आयोगाने जी रोख रक्कम आणि वस्तू पकडल्या. त्याचे जाहीर केलेले अधिकृत आकडेही शेकडो कोटींच्या घरात आहेत.या दरम्यान देशातील बिनीचे उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावर भारतातील भ्रष्टाचाराबद्दल अमेरिकेत गुन्हे दाखल झाले आहेत. देशाचे पंतप्रधान त्यांना पाठीशी घालत आहेत.नागरिक म्हणून अनेक जण या परिस्थितीमुळे अतिशय अस्वस्थ आहेत. जे चाललंय त्याला मूक राहून ते संमती देऊ शकत नाही. त्याविरुद्ध बोलण्याचे बळ भारतीय संविधानाने दिले आहे. म्हणून आज संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षीही नैतिक जबाबदारी आपण घेतली पाहिजे. तसा निर्धार आपण ७५ वर्षांपूर्वीच जाहीर केला आहे. म्हणून स्वतःच्या विवेकाला स्मरून आणि इतरांचा विवेक जागा व्हावा म्हणून महात्मा जोतिराव फुले स्मृती दिनापासून उपोषण करण्याचा निर्णय ९५ वर्षांच्या डॉ. बाबा आढाव यांनी केला होता.राष्ट्रीय एकात्मता समितीचे निमंत्रक नितीन पवार हेही डॉ. आढाव यांच्यासह आत्मक्लेष उपोषणास बसले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here