विविध विषयांवर आंदोलन झाली असून यापुढे सम्बधित कार्यायास घेराव घालणार !
अनिल वीर/सातारा : अनुसूचित जाती-जमातीचे 700 कोटी रुपये लाडक्या बहिणीकडे वळवणाऱ्याचा जाहीर निषेध व इतर मागण्यांसाठीसुद्धा काळी फीत बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.यापुढे न्यायासाठी संबंधित कार्यालयास घेराव घालणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.
फडणवीस,शिंदे व अजितदादा यांच्या सरकारने दलित विरोधी अर्थसंकल्प मांडला आहे. अनुसूचित जाती म्हणजेच सामाजिक न्यायचे चारशे कोटी व अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी विभागाचे तीनशे कोटी असेल असे दोन्ही मिळून 700 कोटी रुपयाचा निधी लाडक्या बहीण योजनेकडे वळवून बहिणींना खुश करण्याकरता मागासवर्गीयाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. त्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे निषेध करीत आहेत.एकंदरच अनेक ठिकाणी मागासवर्गीयांवरती अन्याय-अत्याचार होत आहेत. जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका इत्यादी भागांमध्ये मागासवर्गीयाचा निधी खर्ची काढण्यास अधिकारी उदासीन असतात.यावरती गेल्या दोन वर्षांमध्ये अखर्चित झालेला निधी व आत्ताचा निधी यामधून 700 कोटी रुपये राज्य सरकारने लाडक्या बहिणी योजनेकडे वळवले आहेत. ते त्वरित थांबवावे.
सातारा तालुक्यातील लिंब येथे मागासवर्गीय ऊसतोड कामगारांना आवर्च भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या गाड्या तसेच 14 बैल जोड्या जबरदस्तीने गावगुंडांच्या सहकार्याने ओढून नेणाऱ्या रजपूत व सूर्यवंशी यांच्या टोळीवर सुद्धा ॲट्रॉसिटी तसेच मोकांतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे.जिल्ह्यात समाज कल्याण मार्फत मुली-मुलांची या सर्व वस्तीगृहामध्ये सुविधा मिळाव्यात.पाटण येथील अधिक्षिकेवर झालेली कारवाई कायमस्वरूपी झाली पाहिजे. खेड,ता.सातारा या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांच्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. तरी मागील चार वर्षात पासून प्रतापसिंह नगर व विकास नगर या वार्डामध्ये झालेल्या कामाचे त्रियस्त संस्थेच्या माध्यमातून स्ट्रक्चर एडिट केले पाहिजे.अशा अनेक मागण्याबाबतचे निवेदन सम्बधितांना देण्यात आली आहेत.