सातारा/अनिल वीर : देश आराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहे.तेव्हा संविधानिक हक्क मिळविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे. सामाजिक स्वास्थ्यासाठी आपापसात बंधुभाव राखला पाहिजे.असे आवाहन डॉ.गोरे यांनी केले.
भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन संलग्न सातारा जिल्हा ओबीसी संघटना सातारा जिल्हा अधिवेशन येथील संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था कामाठीपुरा येथे आयोजीत करण्यात आले होते.तेव्हा अध्यक्षस्थानावरून प्रदेशाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर गोरे मार्गदर्शन करीत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सदस्य विलास काळे, सत्याशोधक विद्यापीठ संचालिका सौ.मायाताई गोरे, बी.पी.एस. विदर्भ विभागीय अध्यक्षा सौ. सुनीताताई काळे,वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, रिपब्लिकन सेनेचे प.अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.डॉ.गोरे म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील अधिवेशनास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.सध्या देशात धर्म,राजनैतिक व दलाल यांचाच अनुक्रमे वरचष्मा आढळून येत आहे.त्यांना करमाफी आहे.त्यामुळेच ते सांस्कृतिक दहशत पसरवीत आहेत.तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामंत्राद्वारे शिक्षण घेऊन संघटित झाले पाहिजे.तरच संघर्ष करता येईल.ओबीसींची जनगणना झाली पाहिजे.फुले दाम्पत्यानी योगदान दिले आहे.म.फुले व डॉ.आंबेडकर यासनी लिहिलेल्या ग्रंथाचे वाचन केले पाहिजे.”
विलास काळे म्हणाले, “७५ वर्षांनंतरही ओबीसींना न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे.छ.शाहूंनी ५० टक्के आरक्षण दिले होते.बाबासाहेबांनी सर्वच घटकांना संविधानाच्या माध्यमातून न्याय दिलेला आहे. सुमारे ३४० जातींना अद्याप खऱ्या अर्थाने न्याय मिळावा नाही.आतापर्यंत ज्या काही सोयीसुविधा मिळालेल्या आहेत.त्याचा लाभ समाजाने घेतला पाहिजे.”
प्रारंभी,संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. स्वागताध्यक्ष शहराध्यक्ष श्रीकांत आंबेकर व संयोजक जिल्हाध्यक्ष भरत लोकरे आदींनी मान्यवरांचा सत्कार केला.संजय परदेशी यांनी सूत्रसंचालन केले तर कार्याध्यक्ष संजय पोतदार यांनी आभार मानले.
यावेळी इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये ८० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या अध्ययनार्थीना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हसे गौरविण्यात आले.सदरच्या कार्यक्रमास नेताजी गुरव,जनार्धन पवार, अब्दुल सुतार,संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते,पत्रकार,महिला व विविध संघटनांचे प्रतिनिधी-कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.