सातारा/अनिल वीर : सायंकाळी सुटणारी एसटी रात्री ११ पर्यंत नव्हतीच. मुक्कामी असणारी हातलोटची गाडी आगारातून सुटेपर्यंत एसटी स्टँडवर फक्त दोनच कॉलेजच्या युवती जीव मुठीत घेवुन बसल्या होत्या. तेव्हा वेळेवर सोडावी.अशी आग्रहाची मागणी ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते मधुकर (आण्णा) मोरे यांनी आमच्या प्रतिनिधिकडे केली आहे.
महाबळेश्वर एसटी आगारातून गाड्यांच्या फेऱ्याबाबत अनियमितता असून प्रवाशांना त्रास होत आहे.याबाबत अनेक तक्रारी करूनही प्रशासन सुधारणा करीत नाही.विशेष म्हणजे नागपूरच्या अधिवेशनातही पालकमंत्र्यानी एसटीबाबत सकारात्मक घोषणा केलेली आहे.तरीही जिल्ह्यातील आगारातच असुरक्षिततेची वेळ येत आणत असतील तर करायचे काय ? असा यक्ष प्रश्न वारंवार ऐरणीवर येत असल्याने पालकासह सर्वानाच चिंता वाटत आहे.तेव्हा सर्वच आगारप्रमुखानी आतातरी गांभिर्याने प्रशासनाकडुन वेळेबाबत काटेकोरपणे कार्यवाही करावी. अन्यथा,अनिष्ट घटना घडल्यानंतर होणाऱ्या परिणामास सामोरे जावे लागेल.असाही सूर समाजमाध्यमातून येत आहे.