येवला, प्रतिनिधी :
संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी. पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात साजरी करण्यात आली.
आज विद्यालयाचे प्राचार्य शरद ढोमसे,पर्यवेक्षक आर.जी.पैठणकर,ज्येष्ठ शिक्षक पोपट भाटे,गजानन नागरे,यशवंत दराडे आदींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संस्थेचे आद्य संस्थापक स्व.अण्णाबाबा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.जेष्ठ पदाधिकारी दत्तात्रय पवार,संजय पानमळे, सुकदेव घोडेराव,शैलेश पगारे, जगन घोडेराव आदी पालक देखील उपस्थित होते.यावेळी बोलताना शिका संघटित व्हा व संघर्ष करा या मूलभूत मंत्राचा अर्थ विशद करत डॉ. बाबासाहेबांच्या जीवनाचा सार प्रत्येकाने वाचून आपल्या स्वतःच्या जीवनाच्या परिवर्तनासाठी या गुणांचा स्वीकार करावा असे आवाहन प्राचार्य ढोमसे यांनी केले. डॉ.बाबासाहेब व बौद्ध धर्म या विषयीचा इतिहास श्री.भाटे यांनी सांगितला.यावेळी उमाकांत आहेर,वसंत विंचू,योगेश भालेराव, कैलाश मोरे,लक्ष्मण माळी,योगेश पवार,रविंद्र दाभाडे,संजय बहिरम,सगुणा काळे,रोहिणी भोरकडे,सविता पवार,उज्वला तळेकर,अर्चना शिंदे,विकास व्यापारे,प्रमोद दाणे,मयूरेश पैठणकर,रोहित गरुड, निलेश व्हनमाने,मच्छीन्द्र बोडके, सागर मुंढे आदी उपस्थित होते.