सातारा/अनिल वीर : शेंद्रे,ता. सातारा येथील ग्रामपंचायत समितीचे सदस्य श्रीरंग वाघमारे यांना सुधारक पुरुष पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित व प्रगती लोकसंचलित साधन केंद्र यांच्यावतीने 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद येथे मोठ्या उत्साहात पार पडली. तेव्हा वाघमारे यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे,उपायुक्त पशु विभाग सावंत,जिल्हा समन्वयक अधिकारी विजय डोकेतालुका कृषी अधिकारी धुमाळ,अग्रणी बँक प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र योगेश पाटील,नितिराज साबळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजयकुमार सावंत,पशुसंवर्धनचे सकटे व देशपांडे,सारस्वत बँक व्यवस्थापक, आयसीआयसी बँकेचेचे लक्ष्मण चव्हाण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आयसीआय बँकेतर्फे 20 लाखाचा धनादेश महिला बचत गटांना देण्यात आला. सरपंच महिलांचाही सत्कार करण्यात आला.सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकारिणी, sahyogini, Crp, लेखापाल, एरिया coordinator, गावातील सर्व सहकारी महिला या सर्वांचे उत्कृष्ट सहकार्य मिळाले.