अनिल वीर सातारा : अध्ययनार्थीनी आपल्यातील सुप्त कला गुणांचा शोध घेऊन त्याला योग्य ती दिशा द्यावी.असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद साठे यांनी केले.
किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे श्रम शिबिरात, “‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. ” या विषयाची मांडणी करताना डॉ.साठे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी परखंदी गावच्या सरपंच सौ. चित्रा जाधव होत्या. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. हरेश कारंडे, प्रा. शिवाजी जाधव,उपसरपंच तात्याबा शिंदे व प्रा.राजन करपे होते.
डॉ.आनंद साठे म्हणाले, “आवश्यकतेनुसार सातत्यपूर्वक परिश्रम घेऊन युवकांनी आपले जीवन सुखी व समृद्ध करावे. गिते, नृत्य , एक पात्रि प्रयोग , पथनाटय , मिमिक्री , स्किट , अभिनय , भाषण कौशल्य… इत्यादी सर्व काहीही आपोआप लगेच सर्वांना जमत नाही. यासाठी एकाग्रता व मनापासून करण्याची इच्छा,सातत्य पूर्वक प्रयत्न,कष्ट व साधना करावी लागते. त्यातून मिळणारा आनंद हा सर्व श्रेष्ठ असल्याने जगणे अगदी सहज सोपे होवून जाते. म्हणूनच सर्वांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.”
सरंपच सौ. चित्रा जाधव यांनी राष्ट्रीय सेवा योजने मध्ये सहभागी असलेल्या मूलींनी स्मशान भूमीची स्वच्छता न घाबरता केल्याने व मूलांनी गावची पाणीपुरवठा विहीरीच्या शेजारील स्वच्छता केल्याने मनापासून कौतूक केले. खरोखरच, गावकऱ्यांनी या प्रबोधनाच्या कार्यक्रमास मोठया प्रमाणावर प्रोत्साहन द्यावे.
प्रास्ताविक स्वयंसेवक जेद पटवेकर याने केले. पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचालन प्रज्वल जाधव याने केले.ओम पोळ याने आभारप्रदर्शन केले.याकामी, कर्मचारी चेतन तावरे व शिवंम सुर्यवंशी यांनी अथक असे परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास शिक्षक,अध्यानार्थी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.