सुभेदार चित्रपटाच्या पोस्टरची   लाजवाज झलक !

0

सातारा/अनिल वीर : सुभेदार हा मराठी चित्रपट लवकरच भेटीला येत असून त्याच्या पोस्टरची झलक प्रदर्शित झाली आहे.

           पुणे येथील ट्रॉन ऍनिमेशन महाविद्यालयात सुभेदार टीमने भेट देऊन आकर्षक अशा पोष्टरचे  ढोल-ताशामध्ये प्रदर्शन करून झलक दिल्याने संपूर्ण महाविद्यालय आनंदून गेले होते. यावेळी कलाकारांना प्रश्न विचारण्यासाठी सुमारे ५ चिट्टया टाकण्यात आल्या होत्या.त्यापैकी कु.अनु अनिल वीर हिला संधी मिळाली होती.तिच्या समवेत कु. वेदांती ही मैत्रीण होती.

        सुभेदार ( शिवराज अष्ठक) या चित्रपटाची कलाकृती उत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, अभिनेते यांनी केली आहे. दिगपाल लांजेकर यांच्यसह कलाकार – मृणाल कुलकर्णी (जिजाऊ माता), अजय पुरकर ( तानाजी मालुसरे), नुपूर दैठणकर (महाराणी सोयराबाई) आदीनीही आपापल्या भूमिका उत्कृष्ट केलेल्या आहेत.बघूया, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच.संपूर्ण सिनेरसिकांच्या नजरा सुभेदारकडे लागून राहिल्या आहेत.

फोटो : सुभेदार चित्रपट पोस्टर प्रसंगी मृणाल कुलकर्णी यांच्यासह कलाकार,अनु,वेदांती व इतर.(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here