पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम :
ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारा कृतज्ञता पुरस्कार उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई कडून नवी मुंबई मधील महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ मुंबई – नवी मुंबईचे अध्यक्ष सुरेश पोटे यांना “ज्येष्ठ नागरिक सेवा” कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सुरेश ईश्वर पोटे सामाजिक क्षेत्रात गेली 40 ते 45 वर्ष हिरीहिरीने काम करत आहेत. अनेक संस्था आणि संघटनांमधून विविध पदांवर काम केले व करत आहेत. तसेच समाजातील दलित, मागास व मागासवर्गीय सामाजिक संस्थांमधून महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.तळागाळातील जनतेसाठी विविध शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शनपर कार्य त्यांचे अविरत सुरू आहे.
हे कार्य करत असताना गेल्या 25 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. ज्येष्ठांच्या व्यथा जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा पाठपुरावा करत त्या योजना ज्येष्ठान पर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करत आहेत.
फेस्कॉम या ज्येष्ठांसाठी झटणाऱ्या देशव्यापी संघटनेच्या विविध महत्त्वपूर्ण पदांवरती त्यांनी कार्य केले आहे. अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ (ऐस्कॉन) “हिंदू सूर्य महाराणा प्रताप ज्येष्ठ नागरिक पुरस्कार” महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) “उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक पुरस्कार” तसेच महाराष्ट्र राज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर “समाजभूषण पुरस्कार” 2012 त्यांना मिळाला असून शंभरहूनही जास्त सन्माननीय पुरस्कारांचे ते मानकरी ठरलेअशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांसाठी अविरत कार्य करत आहेत. म्हणून त्यांना हा सन्मान यशवंतराव चव्हाण सेंटरने दिला. त्यावेळेस अध्यक्ष प्रमोद कर्नाड, पद्मश्री अच्युत पालव, सचिव डॉ.अशोक पाटील, कोषाध्यक्ष भाऊसाहेब शिंगाडे, प्रभाकर गुमास्ते, उत्कृष्ट सूत्रसंचलन – पल्लवी देशपांडे यांनी केले. यावेळेस विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.