सातारा : सुर्यपूत्र भैय्यासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर साहेब यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
“दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा ही धम्मसंस्था उध्दारकर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.५ मे १९५५ रोजी स्थापन करुन याच धम्मसंस्थेच्या अधिपत्याखाली दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी स्वत: बौध्द धम्मदिक्षा घेतली. आणि तुम्हा-आम्हांला धम्मदिक्षाही दिली.६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर तमाम भारतीय बौध्दांच्यावतीने दादासाहेब गायकवाड यांच्या उपस्थितीत भैय्यासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांना भारतीय बौध्द महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रदान केली होती.
त्यांनी ती समर्थपणे सांभाळली. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत धम्मदिक्षा दौरे काढून तमाम भारतवासीयांना बौध्द धम्मदिक्षेचे समारंभ करुन भारत बौध्दमय करण्याच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेला दमदार सुरुवात केली होती. भैय्यासाहेब आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीचे ऐक्य व्हावे. या तळमळीने प्रयत्न करणारे, स्वाभिमानी नेते, विचारवंत, लोकनेते, आमदार होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर संपूर्ण भारतामध्ये धम्मदिक्षेचे सोहळे घेणारे, धम्माचा प्रचार-प्रसार स्वत:पासून सुरुवात करणारे,चैत्यभूमीचे शिल्पकार, बौदाचार्यांचे जनक, स्वत: माजी श्रामणेर काश्यप पंडित होते. भैय्यासाहेब आंबेडकर तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांनी चैत्यभूमीचे बांधकाम करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेते लक्ष घालत नव्हते.
चैत्यभूमीसाठी जमा केलेला निधी आजही नेत्यांच्या नावावर पडून आहे. त्यांची मानसीकता भैय्यासाहेबांनी ओळखली होती.त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन बाबासाहेबांचे जन्म ठिकाण महू,इंदौर, मध्यप्रदेश ते चैत्यभूमी (मुंबई) अशी भिमज्योत काढली होती. या भिम ज्योतीच्या माध्यमातून जो जनतेने निधी दिला. त्या निधीतून आपले श्रध्दास्थान तथा पवित्र “चैत्यभूमी” भैय्यासाहेबांनी उभी केलेली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजीक, धार्मीक आणि राजकीय कार्याला साजेसे कार्य करणारे सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी केल्याने कायमच समरणात राहतील.”