वाई प्रतिनिधी; परभणी मध्ये संविधानाचा अवमान झाल्यानंतर भीमसैनिकांना ते सहन झाले नाही. त्यामुळे तीव्र स्वरूपाचे आंदोलन झाले. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना बेदम मारहाण करण्यात आली होती. याचे चित्रीकरण करणारे सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांनाही बेदम मारहाण केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आली.
याप्रकरणी वाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या आदेशावरून युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली नंतर संविधानपर जनजागृती करण्यात आली. वाईचे प्रांत यांना निवेदन देण्यात आले .
निवेदनात नमूद केले प्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी. मृत्यूसाठी कोणी अधिकारी जबाबदार नसेल तर प्रशासनामार्फत खुलासा येणे गरजेचे आहे संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात यावे. यासारख्या विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदन देतेवेळी जगदीश कांबळे, संतोष गायकवाड श्रीकांत निकाळजे रुपेश मिसाळ मधुकर भिसे रामा भोसले चंद्रसिंग गायकवाड सूर्यकांत गायकवाड अविनाश बनसोडे अमर वाघमारे महादेव शेलार अनिल शेलार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सोबतच निवेदनात नमूद असले प्रमाणिक तात्काळ कारवाई न झाल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे