सोळशी येथील शनि मंदिराचे मठाधिपती प.पू नंदगिरी महाराज युवकांचे ठरत आहेत प्रेरणास्थान

0

महाराष्ट्रातील युवकांना स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी करीत आहेत मार्गदर्शन.

मुकुंदराज काकडे : 

       महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सोळशी येथील शनि मंदिराचे मठाधिपती शिवयोगी तपोयोगी परमपूज्य नंदगिरी महाराज हे महाराष्ट्रातील अनेक युवकांचे प्रेरणास्थान असून ते गेली कित्येक वर्ष शनी मंदिरात येणाऱ्या युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील युवक हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. व्यवसायात अग्रेसर होवून पुढे गेला पाहिजे हा उदात्त हेतू समोर ठेवून परमपूज्य शिवयोगी तपोयोगी नंदगिरी महाराज या शनी मंदिरात येणाऱ्या लाखो युवकांना वेळोवेळी मार्गदर्शन करताना दिसून येत आहेत. सातारा जिल्ह्यातील सोळशी येथील शनी मंदिराच्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर असो सर्व रोग निदान शिबिर असो किंवा गरिबांना देत असलेला मदतीचा हात असो असे कित्येक सामाजिक उपक्रमामध्ये शनी मंदिराच्या माध्यमातून परमपूज्य शिवयोगी तपोयोगी नंदगिरी महाराज अखंडपणे समाजाची सेवा करताना दिसून येत आहेत. आज हजारो युवक आपल्या पायावर उभे राहण्यासाठी परमपूज्य नंदगिरी महाराज यांचे मार्गदर्शन घेताना दिसून येत आहेत. व आपल्या जीवनात यशस्वी होताना दिसत आहेत. गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रातून भाविक भक्तगण हे सातारा जिल्ह्यातील सोळशी येथील शनी मंदिरात नतमस्तक होण्यासाठी येत असतात व परमपूज्य नंदगिरी महाराज यांचा यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद घेत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here