सातारा/अनिल वीर : वंचित बहुजन आघाडी पाटण तालुकाध्यक्ष संजय बाबुराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त भिम-बुद्ध गीतांच्या मैफिलीचे आयोजन शुक्रवार दि.१ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय नेते श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत भीमसैनिक जाधव यांनी सातत्याने बहुजन समाजातील दलित,गरीब व कष्टकरी स्त्री-पुरुष जनतेच्या न्याय हक्काच्या प्रश्नांवर निदर्शने , धरणे,मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. म्हावशी,ता.पाटण येथे दु.१२ ते २ भीम गीतांचा कार्यक्रम,२ ते ३वाजेपर्यंत अभिष्टचिंतन,शुभेच्छांचा स्वीकार जाधव स्वीकारणार आहेत. तदनंतर मनोगत होणार आहे. शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ ऐवजी वही-पेन (शालोपयोगी साहित्य) स्विकारले जाणार आहे.त्याचा लाभ समाजातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना मिळेल.अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.