सातारा/अनिल वीर : पी.एल.सी. स्वच्छता मॉनिटर प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात बसाप्पाचीवाडी शाळेने राज्यात प्रभावी कामगिरी करुन राज्यातील ६४,००० शाळांमध्ये ७ वा क्रमांक पटकावून राज्यातील सर्वोत्तम १० मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. सहभाग नोंदणी ६४,१९८ एवढ्या शाळा असून विद्यार्थी संख्या ५९,३१,४१० एवढी आहे.
सोशल मीडिया विडिओ शेअर १५,००,००० + आहेत.महाराष्ट्र कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त करण्याच्या शिक्षण विभागाच्या पीसीएल (PLC) स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचा पहिला टप्पा संपन्न झाला.प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा आणि विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात नेमके काय करायचे ? हे समजण्यासाठीचा महत्वपूर्ण टप्पा आहे. कारण, या प्रकल्पात विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे किंवा संदेश देणारे दूत नसून कळत नकळत झालेली चूक निदर्शनास आणून ती सुधारायला सांगणारे कडक मॉनिटर आहेत. प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांने केला होता. ६४ हजार शाळांची सहभागाची नोंदणी झाली आणि विद्यार्थी वाटेल तिथे कचरा टाकणाऱ्यांना आणि बेफिकीर थुंकणाऱ्यांना जागच्या जागी थांबवून झालेली चूक दाखवून देत होते. विद्यार्थ्यांने “गांधीगिरी” करत इतरांने केलेली घाण साफ करणे अपेक्षित नसून, Lets Change फिल्म मधील “सरदार पटेलबाजी” करत घाण करणाऱ्यालाच साफ करायला विनंती करणे अपेक्षित आहे. स्वच्छता मॉनिटरगिरी म्हणजे सफाई करणे किंवा भाषणबाजी नसल्यामुळे मुलांना मजा येते. आणि त्यापुढे घटनेचे विवरण सांगतानाचे मजेशीर व्हिडीओ करून सोशल मीडियाला शेअर करणे हे त्यांच्या आवडीचे काम बनून जाते. पहिल्या टप्प्यात असे १५ लाखाहुन अधिक व्हिडिओ शेअर झाले आहेत.शालेय शिक्षण मंत्री यांनी प्रस्तावित केलेल्या संकल्पनेला गती मिळालेली आहे. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटरगिरी करण्याची सवय होण्यावर लक्ष्य केंद्रित होणार आहे. ठिकठिकाणी/प्रत्येक चुकीला कोणी ना कोणी point-out केले तर सगळेच जास्ती जागरूक राहतील, आणि महाराष्ट्र निष्काळजी मुक्त बनेल. अशी माहिती प्रकल्प संचालक रोहित आर्या यांनी दिली आहे.
पहिल्या टप्यात राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ५ जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील नोंदणीकृत ६४ हजार शाळांपैकी सर्वाधिक प्रभावी १०० शाळांचे कौतुक आणि सत्कार मुंबई येथे एका कार्यक्रमात केला जाणार आहे. त्याचबरोबर ५ सर्वोत्तम जिल्ह्याचे समन्वयक, शिक्षणाधिकारी आणि निवडक विद्यार्थ्यांना, “महाराष्ट्र स्वच्छता मॉनिटर”ने गौरवण्यात येणार आहे.याकामी बसाप्पाची वाडी येथील शाळा समन्वयक प्रविण क्षीरसागर,सर्व वर्गशिक्षक, मुख्याध्यापक बाळासाहेब माने आणि सहकारी सौ. प्रतिभा चौगुले आणि सौ. अवंती ढेबे यांनी अथक असे परिश्रम घेत आहेत.PLC स्वच्छता मॉनिटर २०२३ मध्ये सातारा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामध्ये बसाप्पाचीवाडी शाळा जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात सातवी. त्यामध्ये बसाप्पाचीवाडी शाळेतील अनय अधिक चव्हाण याने उच्चांकी २११ क्रियाकलाप केले. आरळे केंद्रातील २ शाळा राज्याच्या दहामध्ये आलेल्या आहेत.जिल्हा समन्वयक विशाल कुमठेकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे,शिक्षण विस्ताराधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख सुरेश भुरकुंडे, सरपंच सुरेखा देशमुख, सर्व सदस्य आणि शा. व्य. समिती अध्यक्ष सतिश कदम आणि सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.