सातारा/अनिल वीर : चित्रपट अभ्यासक स्वप्नील पोरे लिखित, “स्वरसागर” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवार दि.२५ रोजी सायंकाळी ६ वा.पत्रकार भवन,नवी पेठ,पुणे येथे रंगणार आहे.
दिपलक्ष्मी पतसंस्था व प्रतीक प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ट लेखक व संपादक विनय हर्डीकर यांच्या हस्ते व ज्येष्ट संगीततज्ञ व संपादक सुरेश साखवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.अशी माहिती म.सा.प.पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस व प्रतीक प्रकाशकाचे प्रवीण जोशी यांनी दिली.
चित्रपट अभ्यासक स्वप्निल पोरे यांनी हिंदी चित्रपट संगीतातील १७० पार्श्वगायकांवर ‘स्वरसागर’ हा ग्रंथ लिहिला आहे. यानिमित्त मराठीतील ख्यातनाम लेखक समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांनी या ग्रंथाचा करून दिलेला मनोज्ञ परिचय आहे. चित्रपटविषयक ललित लेखन करणारे स्वप्निल पोरे यांनी नुकताच आपला ‘स्वरसागर’ हा प्रचंड मोठा संदर्भ ग्रंथ घेऊन मराठी साहित्यात दाखल झाले आहेत. हिंदी चित्रपट गीतांसंबंधी मराठीत लिहिले गेलेले सगळे साहित्य आहे. इतका मोठा, एवढा अद्ययावत, एवढा परिपूर्ण आणि सर्वांगसुंदर ग्रंथ म्हणून ‘स्वरसागर’ एकमेवद्वितीय आहे. हा हिंदी चित्रपटाच्या प्रारंभापासून सुवर्णकाळापर्यंत (१९६०-७०) अतिशय महत्त्वाची माहिती इथे ग्रंथित झालेली आहे. सामान्य रसिकाला असं वाटत की, सहाय्या आणि सातव्या दशकानंतर हिंदी चित्रपट गीतात सांगण्यासारखं नमूद करण्यासारखं उरतंच काय? परंतु, स्वप्निल पोरे यांचा ‘स्वरसागर’ हा ग्रंथ सुवर्णयुगानंतर सर्व काही संपलं नाही. हे ठासून सांगणारा महान ग्रंथ सिद्ध झाला आहे. स्वप्निल पोरे यांची लेख सिद्ध करण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. लेखाच्या सुरुवातीला ते गायक किंवा गायिकेच्या जन्मगावापासून तर बालपणापर्यंत सुमारे तीन ते चार परिच्छेदात माहिती आटोपतात. नंतर त्या गायकाचा किंवा गायिकेचा हिंदी चित्रपट क्षेत्राशी कसा आणि कोणामुळे संबंध आला? हे सांगतात. त्या कलावंतांची कारकीर्द जेवढी मोठी असेल.तेवढी पृष्ठसंख्या त्याला द्यायला ते कचरत नाहीत.
फोटो : स्वरसागर पुस्तकाचा पृष्ठभाग.(छाया-अनिल वीर)