“स्वरागिनी” गीत मैफिलीने सातारकर रसिक झाले श्रोते मंत्रमुग्ध !

0

अनिल वीर, सातारा :  सामाजिक कार्यकर्ते शिरीष चिटणीस यांनी सर्व पातळीवर आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. असे प्रतिपादन आ.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथे केले. 

             येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने शाहूपुरी येथे आयोजित केलेल्या “स्वरागिनी” दिवाळी पहाट कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी संस्थेचे संस्थापक- चेअरमन शिरीष चिटणीस, श्रीकांत कात्रे, काका पाटील, लाला शेठ बागवान,अप्पा शालगर, प्रदीप देशपांडे, अनिल चिटणीस, वि. ना.लांडगे शिल्पा चिटणीस, जगदीश खंडागळे, विनायक भोसले, रवींद्र कळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

                 

आ.भोसले म्हणाले,   “शिरीष चिटणीस यांचे संबंध भाऊसाहेब महाराज, आईसाहेब असतील मी किंवा खासदार उदयनराजे असतील सगळ्यांबरोबर विकासाच्या माध्यमातून त्यांचे संबंध निर्माण झालेले आहेत. शहरामधील ६६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले होते.त्यामध्ये शिरीष चिटणीस यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.”

           शिरीष चिटणीस म्हणाले, “गेली सतरा वर्षे शाहूपुरीच्या या प्रांगणात दिवाळीचा कार्यक्रम सुरू आहे.

सातारच्या राजघराण्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणूस सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. त्याचे ज्वलंत उदाहरण मी तुमच्यासमोर उभा आहे.” यावेळी रमणलाल शहा यांचे मनोगत झाले.तद्नंतर “स्वरागिनी” या गीत मैफिली पहाटेच्या आल्हाददायक  वातावरणांत शाहूपुरीचा मध्यवर्ती चौकात संपन्न झाली.

 ” स्वरागिनी ” या सदाबहार हिंदी आणि मराठी गीतांचा श्रवणीय सुमधुर “दिवाळी पहाट” कार्यक्रमात सुजाता दरेकर, सुधीर मुळे ,जितेंद्र पवार,   गीतांजली पाटील , श्वेता जाधव यांनी आपली सुमधुर गीते रसिक श्रोत्यांसाठी सादर केली असून तबला व ढोलकी ची साथ शुभम दाखले यांनी दिली सिंथेसायझर प्रवीण जाधव,ऑक्टोपॅड ला अमोल वाघ यांची साथ लाभली असून  कार्यक्रमाचे  निवेदन  संजय क्षीरसागर यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे संयोजन सुजाता दरेकर यांचे असून कुलदीप पवार यांची ध्वनी व्यवस्था लाभली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here