अनिल वीर सातारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ सातारा येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तेव्हा जिल्ह्यातील विवीध आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सभागृहात काही कारण नसताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना करणारे वक्तव्ये केल्याने संपूर्ण विश्वातील आंबेडकरी अनुयायी यांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी देशाची माफी मागावी. शिवाय, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. या व इतर मागण्याबाबत लोकशाहीच्या मार्गाने शांततेत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात प्रथमतः एकत्रीत येऊन पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तद्नंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.शहरातून मोतीचौक मार्गे पोलीस मुख्यालय,पोवई नाका असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामोर मोर्चाची सांगता झाली.दरम्यान,रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे रेस्टोरंट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येऊन एकसंघ मोर्चे झाल्याने अमित शहा विरोधार्थ घोषणांनी परिसर दणाणून गेला.सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदरच्या मोर्चामध्ये ज्येष्ट साहित्यिक पार्थ पोळके,संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रमेश इंजे,सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे, सचिव बी.एल. माने,समता सैनिक दलाचे शिवनाथ जावळे व सहकारी,भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा संगीताताई मंगेश डावरे,नंदकुमार काळे व सहकारी, रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत खंडाईत,सचिन मोरे, सतीश माने,सचिन कांबळे आणि सहकारी,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप,संदीप कांबळे,शहराध्यक्ष मिलिंद कांबळे, सुधाकर काकडे, सुभाष गायकवाड आणि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते, धम्मचारी संघादित्य, पँथरचे जिल्हाध्यक्ष अरविद गाडे,मधुकर आठवले,सर्व क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.