हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी मोजा इतके पैसे

0

सातारा : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्‍टिकोनातून एक एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ३१ मार्च २०१५ पूर्वी बसविणे बंधनकारक आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा व फलटण या कार्यालयांच्या अभिलेखावर नोंद असलेल्या वाहनांकरिता झोन क्रमांक दोनमध्ये मेसर्स रियल मॅझॉन इंडिया लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाहनधारकांच्या सोयीकरिता या कंपनीचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट फिटमेंट सेंटर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. वाहनधारकांना आवाहन करण्यात येते, की शासनाच्या परिवहन विभागाच्या https:/transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील, तसेच वाहनधारकांना आपल्या नजीकच्या कंपनीचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट फिटमेंट सेंटरवर अपॉईटमेंट घेऊन सदरची सुविधा घेता येईल.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता वाहन प्रकारनिहाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट शुल्क जीएसटीसह – टू व्हिर्लस व ट्रॅक्टर्ससाठी ५३१ रुपये, थ्री व्हिर्लससाठी ५९०, लाईट मोटार व्हेईक्ल्स/पॅसेंजर कार/मीडियम कमर्शिअल व्हेईक्ल्स/हेवी कमर्शिअल व्हेईक्ल्स आणि ट्रेलर/कॉम्बिनेशनसाठी ८७९.१. याप्रमाणे शुल्क आकारण्यात येईल.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट कंपनी फिटमेंट सेंटर पुढीलप्रमाणे आहे.
कोरेगाव-सातारा पंढरपूर रोड, वसुधा पेट्रोलपंपाशेजारी. सातारा-हेम कंपनी, फ्लुरा हॉटेलजवळ, वडूज-वरद ॲटोमोबाईलजवळ कऱ्हाड रोड, खंडाळा-शिवाजी चौक मार्केट यार्ड खंडाळा-लोणंद रोड, वाई-वाई बावधन रोड अथर्व आदित्य फटाकाजवळ, फलटण-शिंगणापूर रोड समर्थ ऑफसेट अजितनगर कोळकी, दहिवडी- मायणी रोड बीएसएनल ऑफिसच्या समोर, महाबळेश्वर- नॅशनल गॅरेज टॅक्सी स्टँड दत्त मंदिर जवळ. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here