महाबळेश्वर: शनिवारी ठिकठिकाणच्या दत्त मंदिरातून दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात दत्तजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. दत्तदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. यानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम, तसेच महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री दत्त जयंती सोहळा महाबळेश्वर शहरांमध्ये एकात्मतेचे संदेश देणारा असतो.सर्व धर्म समभाव या सद्भावनेने श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येते .शहर व परिसरातील अन्नदात्यांच्या माध्यमातून जवळपास सात ते आठ हजार भाविक महाप्रसाद घेतात.यामध्ये १३ डिसेंबर पासून दोन दिवसाचा हा दत्त जयंती सोहळा संपन्न होत असतो.
श्री दत्त पादुकांना श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे महाभिषेक होतो सकाळी सहा वाजता श्री दत्तगुरूना अभिषेक व दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा बारा वाजता श्री दत्तगुरू जन्म सोहळा संपन्न होतो . पूर्ण दिवसभर सुस्वर भजन मंडळांचा कार्यक्रम संपन्न होत असतो सोहळा संपन्न करण्यासाठी श्री दत्त मंदिर कमिटी अध्यक्ष दत्तात्रय जाधव याच्या मार्गदर्शनाखाली टॅक्सी युनियन व टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी अथक प्रयत्न करत असतात. येथील छत्रपती श्री संभाजी महाराज वाहनतळ परिसरात भाविकांसाठी तीर्थ महा प्रसाद याची व्यवस्था करण्यात आली होती.शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी महाप्रसाद आस्वाद घेतला.यावेळी श्री दत्त जयंती उत्सव समितीचे,उपाध्यक्ष युसूफ मुजावर, कार्याध्यक्ष अनिल पार्टे, सचिव संतोष डोईफोडे महाबळेश्वर मध्ये स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष जावेद मुजावर,उपाध्यक्ष बबन ढेबे, सेक्रेटरी सी.डी. बावळेकर,आजी-माजी संचालक,वाहन चालक-मालक महिला,पुरुष,युवक,युवती, आबालवृद्ध व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ पासून या सर्व ठिकाणी भक्तांनी दर्शना साठी रांगा लावल्या होत्या संपूर्ण दत्त मंदिर परिसर श्री दत्त नावाचे भक्तीत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नाम स्मरणात तल्लीन झाला होता तालुक्यासह,शहरातील भागातील विविध भजनी मंडळांनी आपल्या सुस्वर भजनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होत तर येथील टॅक्सी संघटनेचे हिंदी मुस्लिम बांधवांनी सालाबाद प्रमाणे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवीत येथील दत्त मंदिर येथील सर्व कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला होता श्री दत्त गुरूंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला.