हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कलावंत दि.२२ रोजी धरणे-आंदोलन करणार !प्रकाश अवचार

0

सातारा/अनिल वीर : राज्यातील सर्व प्रकारचे समाज प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम कलावंत करतात.समाजात जनजागृती करतात.त्यातून मिळालेल्या पैशातून परिवार चालविणाऱ्या  लोक कलावंतांना न्याय हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानतर्फे दि.२२ रोजी धरणे-आंदोलन होणार असल्याची माहिती बंधुत्व पुरस्कार विजेते तथा प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष प्रकाश अवचार यांनी दिली.

                 येत्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर एक दिवसीय धरणे आंदोलन दि.२२ रोजी दुपारी १२ वाजता यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी गृह खात्याने परवानगी दिली आहे. गेल्या चार वर्षांपासून कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. म्हणून प्रतिष्ठानच्यावतीने कलावंतांच्या समस्या मांडल्या होत्या. अनेकदा प्रशासनामार्फत शासनाकडे निवेदन सादर केलेले आहेतच. त्याचप्रमाणे राज्यातील लोक प्रतिनिधी/आमदार यांच्या मार्फतसुध्दा संमधित मंत्रीमहोदय यांना निवेदन दिलेले आहेत. तेव्हा त्यांचा पाठपुरावा करणं आजही सुरू आहे. म्हणून धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कलावंतांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व त्यांचे पुनर्वसन व्हावे. या उद्देशाने शासनाकडे काही ठराविक व वाजवी अशा मागण्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

          कलावंत मानधन सरसकट  रु.५ हजार करावे. वय वर्षे ४५ करावे.उत्पन्न मर्यादा रु.१ लाख करावी.शिवाय, कार्यकाल अनुभव १० वर्ष करावा. कलावंतांना  म्हाडासह घरकुल योजनेचा लाभ द्यावा. एसटी प्रवास सवलत देण्यात यावी. 

पंस,नप,जिप व म,नपा आदी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत कलावंतांना आवश्यक वाद्य साहित्य देण्याची योजना आखावी. कलावंतांना ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत राजकीय आरक्षण द्यावे.तालुक्याच्या ठिकाणी आमदार निधितून‌‌‌ कलावंत भवन बांधावे.आकाशवाणी केंद्रावरील लोक कलावंतांसाठी कार्यक्रम सुरू करावा.कार्यक्रमां साठी निवड करण्यात आलेल्या संस्थांना त्वरित कार्यक्रम द्यावे. बैंड बैजो  व्यावसायिक कलावंतांना कलावंतांचा दर्जा द्यवा.राज्यात वृध्द कलावंत मानधन निवड समित्यांवर प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या द्याव्या. इतर महामंडळाच्या धर्तीवर कलावंतांसाठी कल्याण मंडळ स्थापन करावे. कलावंतांच्या मागण्या शासनाने मंजूर केल्या तर कलावंतांना न्याय मिळेल. तेव्हा धरणे आंदोलनात संबंधितांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष महेंद्र वाहाणे,शेषराव कावरखे, प्रकाश वाघ,जीवन मोहिते, श्रावण सोनोने, विनोद इंगळे, महीला आघाडी अध्यक्षा ऍड. सुजाता जयघोष वालदेकर , प्यारेलाल उच्चीबगल व  डॉ.साहित्यक रमेश गोटखडे  यांनी  केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here