सातारा : मिळकत करमुक्ती न्याय मागणीबाबत मुख्यमंत्री ना.शिंदे यांनी पालिका प्रशासनास घरपट्टी वाढ स्थगित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.असे प्रसारमाध्यमातून समजत आहे. नागरिकांची मिळकत कर मुक्ती न्याय मागणी मंजूर केलेला ठराव डिसेंबर-२०२२ मधील चालु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनातच मंजूर करून अधिवेशन संपण्यापूर्वी अधिकृतपणे मुख्यमंत्री यांनी घोषणा करावी.अन्यथा,थाळी वाजवा आंदोलन छेडण्यात येईल. असा अंतिम इशारा नागरी विकास परिषद, महाराष्ट्र यांनी दिला आहे.
येथील शहर सुधार समिती – शहर परिसर समिती व नागरी विकास परिषद यांच्या संपर्क कार्यालयात सहविचार सभा संपन्न झाली.तेव्हा वरील निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
थाळी वाजवा आंदोलन हे पालिका,छ.शाहु चौक व डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर मध्यभागी करण्यात येणार आहे. तदनंतर रॅलीने छ.शिवराय पुतळ्याजवळ व समारपोप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही थाळी वाजवा आंदोलन करण्यात येणार आहे.समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी व संबंधितांनाही निवेदन देण्यात येणार आहे. सदरच्या सभेस माजी सभापती बापू पार्टे, विक्रांत पवार, विजय निकम,अस्लम तडसरकर, प्रकाश खटावकर,विशाल निकम,पुष्पा गडकरी,शालन जयवंत गायकवाड,के.परशुराम,संतोष सुपेकर,श्रीमती बारटक्के,अनिल वीर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.