१५ व्या वित्त आयोगामधून विविध साहित्य वितरण

0

सातारा/अनिल वीर : १५ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत राहुडे,ता.पाटण यांच्यावतीने विविध साहित्य वितरण करण्यात आले.

           सन २२/२३ १५ व्या वित्त आयोमधून बौध्द बांधवासाठी शव वाहीनी, अंगणवाडीला १६७ कपाट वजन काटा व १६८ टेबल वजन काटा सुपूर्द करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.आरती गुरव, उपसरपंच प्रशांत चव्हाण, अजय चव्हाण,सदस्य, ग्रामविकासाधिकारी करणे, राहुल रोकडे, भाऊसो चव्हाण,दाजीराम चव्हाण,अंगणवाडीच्या सेविका सौ. साधना पाटील,मदतनीस भारती चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

 यावेळी उपसरपंच प्रशांत चव्हाण व अजय चव्हाण यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कार्यरत राहील.असे आश्वासन दिले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here