महाबळेश्वर: २२ डिसेंबर २०२४, आजचा दिवस खगोलशास्त्रीयदृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे. दरवर्षी २२ डिसेंबर हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस म्हणून ओळखला जातो. याला ‘विंटर सॉल्स्टिस’ अर्थात हिवाळी संक्रांती असे म्हणतात. या दिवशी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून सर्वाधिक दूर असतो, ज्यामुळे सूर्याच्या किरणांचा कल दक्षिण गोलार्धाकडे अधिक राहतो.
आजच्या दिवशी दिवसाचा कालावधी फक्त १० तासांपर्यंत मर्यादित राहतो, तर रात्रीचा कालावधी सुमारे १४ तासांचा असतो. महाराष्ट्रातही सूर्य सकाळी ७ वाजून १ मिनिटांनी उगवला आणि सायंकाळी ५ वाजून २१ मिनिटांनी मावळला, अशी नोंद घेतली गेली आहे.
विंटर सॉल्स्टिसनंतर दिवसांचा कालावधी हळूहळू वाढत जातो. हा दिवस शेतकरी, खगोलशास्त्रज्ञ, तसेच हवामान अभ्यासकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. जगभरातील विविध संस्कृतींमध्ये हा दिवस साजरा करण्यासाठी विशेष परंपरा आणि सण आहेत.
निसर्गाच्या या अद्भुत चक्राचे आकलन करून आपल्या दिनचर्येत सकारात्मक बदल घडविण्याची ही संधी आहे. म्हणूनच, २२ डिसेंबर हा दिवस निसर्गाच्या ऋतुचक्राचा आदर करण्याचा आणि विज्ञानाच्या अद्भुततेचा अनुभव घेण्याचा दिवस मानल्या जातो.