24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

सातारा दि. 20 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेहाळाव्याचे 24 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती   जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.

                या मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, सी.एन.सी. ऑपरेटर अशा प्रकारचे 55 पेक्षा अधिक  रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02162-239938 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here