MH11 मेलडी मेकर्सच्या संगीत मैफिलिस सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

0

विशाल अँटिक यांच्यासह सर्वच नवगायकांनी जिंकली उपस्थितांची मने 

सातारा / प्रतिनिधी : सातारा येथील देवी चौकातील विशाल अँटिक शॉपीतून विक्री झालेल्या कराओके माईकच्या माध्यमातून संगीतात अभिरुची असणाऱ्या नवगायकांना एकत्रित करून सुरू झालेल्या MH 11 मेलडी ग्रुपच्या संगीत मैफिलीच्या नुकताच झालेल्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये हा कराओके गीत गायनाचा कार्यक्रम झाला.

विशाल निकम यांचे देवी चौकात विशाल अँटिक शॉपी हे वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या विक्रीचे दुकान आहे. तेथे कराओके सिस्टीमचे माईकसुद्धा विक्रीस उपलब्ध आहेत. विशाल निकम यांना गायनाची आवड असल्याने त्यांनी आपणाकडून माईक विकत घेणाऱ्या संगीतप्रेमी ग्राहकांना एकत्रित केले व दुर्गा राजपुरोहित यांच्या सहकार्याने MH 11 मेलडी मेकर्स ग्रुपची स्थापना केली. अवघ्या दोन ते तीन महिन्यात या ग्रुपच्या माध्यमातून सर्व संगीतप्रेमी एकत्रित आले व त्यांनी नुकताच गीत गाण्याचा कार्यक्रम सादर केला. साताऱ्यातील सुप्रसिद्ध गायक हेमंत गिरी, संतोष जिरेसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रुपने या संगीत विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्यासह पल्लवी शहा, साक्षी साठे, शुभांगी गुरव, अनुपमा जमदाडे, जयेश देटे, संतोष जाधव, अशोक निकम, विकास नलावडे, संस्कृती खांडके, चेतन भडकमकर, संदेश कांबळे आदींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

विशाल अँटिक यांनी बहारदार सूत्रसंचालन करून आणि विनोदी किस्से सांगून या कार्यक्रमात रंगत आणली. यांच्यासह सर्वच कलाकारांना माध्यमातून नवा संस्कृती म्हणजेच साताऱ्यात उदयास आल्याची प्रतिक्रिया  व्यक्त केली तसेच विशाल  यांच्या निवेदन शैलीचे कौतुक करून अनेकांनी त्यांना या क्षेत्रात उज्वल भवितव्य असल्याचे सांगितले. तसेच सर्वच कलाकारांनी उत्तम गीत गायनाचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. साताऱ्यातील विविध प्रसिद्ध ठिकाणांची नावे असणारे सादर करून विशाल अँटीक यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here