आम्ही चीन सारखंच कर्नाटकात जाऊ- संजय राऊत

0

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वारंवार शाब्दिक हल्ले करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणतीही भूमिका घेत नसल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) चे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

ज्याप्रमाणे चीन भारतात घुसू पाहत आहेत त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचे नेते कर्नाटकात जायला कमी करणार नाही असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

“केंद्रातील भाजप सरकार नेहमी म्हणतं की ते चीनला भारताचा एक इंचही तुकडा देणार नाही. तरीही चीन भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असतो. चीन सारखंच आम्हीही कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात जाऊ. आम्हाला कोणाच्याच परवानगीची गरज नाही. हा एकसंध देश आहे आणि आम्हाला शांतता हवी आहे. महाराष्ट्रातलं सरकार दुर्बळ असल्यानेच कर्नाटक सरकार वारंवार वाद वाढवण्याचं काम करत असतं,” असंही ते पुढे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here