संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त शहरातून भव्य मिरवणूक

0

कोपरगाव : संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कोपरगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर समाजाच्या जागेवर अतिशय मंगलमय वातावरणामध्ये संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजाचा जय घोष करण्यात येत होता .तसेच या मंगलमय वातावरणात भजन प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला . काशीनाथ शेठ चौधरी यांच्या वतीने महाप्रसादचा अन्नदानाचा सर्व समाज बांधवांनी आस्वाद घेतला. त्याच बरोबर नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीत साकुरी येथील समाज भगिनी सौ प्रगती ताई खंडागळे व श्रीमंती सिंधुताई देवकर यांचा समाजाच्या वतीने सन्मान चिन्ह आणि हार शाल श्रीफळ येऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर लोखंडे सर व अमोल महापुरे यांनी समाजाच्या कामासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये देणगी दिली. नाशिक येथील व कोपरगावाचे जावाई श्री केदार यांनी संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची मुर्ती दिली .गणपत सोनवणे यांनी विठ्ठल रखुमाईची मुर्ती इतर चार मुर्त्या त्यांच्या वडीलांच्या स्मरणार्थ दिल्या . आनंद शेलार यांनी अकरा हजार रुपये व माणिक कर्डिले यांनी अकरा हजार रुपये मंदिरासाठी देणगी दिली. यावेळी कोपरगाव शहरातील सर्व समाज बांधव सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहिले. संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी यांनी सर्व समाज बांधवांना जे समाजांचे काम चालू आहे. सभामंडप व मंदिराचे बांधकाम संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी सर्व समाज बांधवांना सडळ हाताने जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन केले. ज्या समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात पैसे व वस्तू दान केल्याबद्दल आभार व्यक्त केलं. समाजासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांचे त्यांनी आभार मानले. आमदार साहेबांनी कामाला सुरुवात करण्यासाठी उभारी दिली त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे दहा लाख रुपये निधी मंजूर करुन दिला म्हणून संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टने कामाला सुरुवात केली . आमदार साहेबांनी इतर निधी मंजूर करण्यासाठी अनमोल असं सहकार्य केले त्याच बरोबर समाजांचे भुषण आमदार बावनकुळे यांचेही आभार मानले. त्यांनी वीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला . त्याच बरोबर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे व राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला . त्याकरिता आमदार आशुतोष काळे व राष्ट्रवादीचे ओ बी सी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर भाऊ बाळभुदे यांचे विशेष सहकार्य लाभले. खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. असा एकूण पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. व काम जवळ पास एक कोटी पंधरा लाख रुपये खर्च येईल असा अंदाज आहे . मंदिराचे व सभामंडपचे कामाला दोन्ही काम प्रगतीपथावर चालू आहे. या सर्वांचे समाजे जिल्हाध्यक्ष व संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष रमेश गवळी यांनी समाजाच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन गायकवाड सर यांनी केले व आभार युवराज सोनवणे व राजेंद्र वालाझाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी व संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्टने अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here